बीड :- SBI ,रजिस्ट्री ऑफिस मधील 133 जण होम क्वारंटाईन!
बीड : शहरातील SBI बँकेची शाखा व रजिस्ट्री ऑफिस बंद झाल्याने बीडकरांच्या नाकी नऊ आलेले आहेत . आता आरोग्य विभागाच्या पथकांनी कार्यालयात जाऊन आज दि.11 रोजी सायंकाळचे 7 वाजेपर्यंत अधिकारी, कर्मचारी, मुद्रांक विक्रेते, झेरॉक्स दुकान मालकांसह अन्य असे एकूण 133 जण होम क्वारंटाईन केले होते.
जिल्हा आरोग्य विभागाच्या सूचनेवरुन शहरातील एसबीआय बँक शाखा व रजिस्ट्री ऑफिस सील करण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या दोन पथकांनी खातरजमा करुन कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा शोध घेतला. त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या एकूण 133 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाची क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु असून संपर्कात लोक क्वारंटाईन केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र कासट यांनी दिली आहे