बीड

आष्टी:आरोग्य सेविकेला शिवीगाळ,8 जणांवर गुन्हा दाखल

आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील क-हेवडगांव येथे मातावळी येथे कंटेन्मेंट झोन लागू झाल्याने पोखरी,आंधळेवाडी,
क-हेवडगाव,क-हेवाडी,मातावळी,वनवेवाडी ,मातकुळी हे गावे माझेकडे सध्या कोविड १९ या महामारीचा प्रादुर्भाव असल्याने या गावात नवीन कोण लोक येतात जातात व गरोदर मातांची आरोग्याची तपासणी व लहान बाळाचे लसीकरण करण्याची जबाबदारी आरोग्य सेविकेकडे जबाबदारी असते.जवळच कंटेन्मेंट झोन असल्याने येथील पोखरी उपकेंद्रात कार्यरत असलेले आरोग्यसेविका सुवर्णा साठे यांनी सर्वे करून बाहेरगावावरून आलेल्या लोकांची यादी का दिली ? तुझ्यामुळेच आम्हांला कॉरंटाईन व्हावे लागले असे बोलत क-हेवडगांव येथील कॉरंटाईन केलेल्या नातेवाईकांनी आरोग्य सेविकेला शिवीगाळ व जीवेमारण्याची धमकी दिल्याने ८ जणांवर आष्टी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की,प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळसिंग अंतर्गत उपकेंद्र पोखरी येथे आरोग्य सेविका सुवर्णा साठे या तेथे कार्यरत आहेत. पोखरी,आंधळेवाडी ,क-हेवडगांव, क-हेवाडी, मातावळी,वनवेवाडी ,मातकुळी हे गावाकडे सध्या कोविड-१९ या महामारीचा प्रादुर्भाव असल्याने या गावात नवीन कोण लोक येतात जातात व गरोदर मातांची आरोग्याची तपासणी व लहान बाळाचे लसीकरण करण्याची जबाबदारी आहे दोन दिवसापूर्वी क-हेवडगांव येथे पुण्याहून तीन लोक बाळू गायकवाड,निकिता शिंदे,सपना शिंदे पनवेल हून शजन नामे रेश्मा वाघमारे हे आले त्याची मला माहिती मिळताच मी तालुका आरोग्य अधिकारी यांना कळविले.
अशी फिर्याद सुवर्णा साठे यांनी दिली.यानुसार आरोपी यांच्यावर गु.र.न.०१८१/२०२० कलम ३५३,३५४,३३२,३२३,५०४,५०६,
१४३,१४७,१४९ यानुसार आठ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक भारत मोरे हे पाहत आहे.