बीड

निगेटीव्ह अहवालाचा जल्लोष अंगलट

माजलगाव: माजलगाव शहरातील देशपांडे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका वृद्धाचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. त्यामुळे सदर रुग्णाच्या संपर्कातील आलेल्यांचे स्वॅब तपासण्यात आले. त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर रुग्णालयासमोर ढोल वाजवून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी बेभान नाचणाऱ्यांमुळे शारिरीक अंतराचाही फज्जा उडाला. निगेटीव्ह अहवालाचा केलेला जल्लोष देशपांडे हॉस्पिटलच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्यामुळे या प्रकरणी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात डॉक्टरसह स्टाफवर गुन्हा नोंद करण्यात आला