बीड

गेवराईच्या तहसीलदारास टिप्परने उडविले

बीड-दि.11 रोजी सायंकाळच्या वेळी वडगाव ढोक परिसरात गेवराईचे तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या गाडीला अवैध वाळू उपसा करणारे टिप्परने उडविले.गेवराई तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी वाळू भरुन चाललेला हायवा टिप्पर आडवण्याचा प्रयत्न केला.टिप्परच्या पुढे गाडी उभी केली असता टिप्परने पाठीमागून गाडीला धडक दिली. यामध्ये गाडीच्या पाठीमागील भागाचे नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कुणाला काहीही झाले नाही.टिप्पर चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहेत. दोन्ही गाड्या गेवराई पोलीस ठाण्यात नेण्यात आल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे घटनास्थळी पोहचले आहेत. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कैलास हादगुले
गेवराई