बीड

अज्ञात वाहनाच्या धडकेत भोळसर युवक ठार

तालखेड दि ११ ( प्रतिनिधी )
अज्ञात वाहनाच्या धडकेत टाकरवण येथील ३० वर्षीय युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग २२२ ( ६१ ) धर्मेवाडी फाट्यावर घडली आहे.   याबाबतीत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की,संतोष गिरमाजी पट्टेकर वय ३० वर्ष हा टाकरवन येथील भोळसर युवक गेवराई तालुक्यातील नांदलगाव येथे पाई आजोळी जात होता. सदरील परिसरात मुसळधार पाऊस पडत होता.यावेळी या भोळसर व्यक्तीने अंगावरील सर्व कपडे काढून टाकून नग्न अवस्थेत तो पायी चालत जात होता. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग २२२ ( ६१)  वरील धर्मेवाडी  फाट्यावर अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली.या धडकेत तो जागीच ठार झाला.ही घटना गुरुवारी पहाटे ५ च्या दरम्यान घडली.मृत शरीर शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. अज्ञात वाहना विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. पवार,खराडे हे करत आहे.Attachments area