Popular News

N95 मास्कचा काळाबाजार!

संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्याच्यापासून सुरक्षित राहण्यासाठी सध्या N95 मास्क आवश्यक बनलेला आहे. ही गरज ओळखून यावरही नफेखोरी मिळविण्यासाठी या मास्कची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली असून N95 मास्कची किंमत 4 महिन्यात 250 टाक्यांनी वाढली. मात्र, त्यावर प्रशासनाला नियंत्रण ठेवता आलेले नाही. परिणामी एन95 मास्कचा काळाबाजार वाढत आहे.

चेहरा झाकण्यासाठी एन95 मास्क गरजेचा असल्याचेही सांगण्यात आलं. संपूर्ण जगभरामध्ये कोरोनानं घातलेला धुमाकूळ पाहिल्यानंतर मास्क किती महत्वाचा आहे, याची जाणीव झाल्यानंतर या मास्कची निर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी मास्कची किंमत अव्वाच्या सव्वा वाढवली. शासनाला सप्टेंबर 2019 ला N95 मास्क 12 रुपये 25 पैशांना उपलब्ध होत होते. तर जानेवारी 2020 मध्ये हेच मास्क 17 रुपये 33 पैशांना मिळू लागले आणि मार्चच्या शेवटी पर्यंत 42 रुपयांना हे मास्क मिळू लागले. त्यानंतर मे महिन्याच्या मध्यावधीला 63 रुपयांना हे मास्क उपलब्ध झाले होते.