Popular News

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर!याच वर्षी होणार IPL -गांगुली

11 जून : कोरोनामुळं जगभरातील सर्व स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. या कोरोनामुळं क्रिकेट विश्वाचे सर्वात जास्त नुकसान झालं आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळख असलेल्या आयपीएलवरही कोरोनाचे सावट आहे. 29 मार्च रोजी आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, मात्र कोरोनामुळं ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. मात्र आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं याच वर्षी आयपीएलचे आयोजन करणार असल्याचे सांगितले आहे.

बीसीसीआयच्या वतीनं एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये याच वर्षी आयपीएलचे आयोजन करण्यासाठी प्लॅन तयार केला जात असल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच, आयपीएलचे आयोजन झाल्यास ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय आयोजित करण्यात येईल. दरम्यान अद्याप या स्पर्धेची तारिख जाहीर करण्यात आलेली नाही आहे.