बीड

बीडकर चिंतेत तर प्रशासनाच्या नाकी नऊ!

बीड : मसरत नगर मधील 3 पॉझीटीव्ह आलेले रुग्ण क्वारंटाईनचा आदेश असताना बीड मधील अनेक सार्वजनिक ठिकाणी फिरल्याने बीड प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत तर बीडकर चिंतेत आहेत. या तिघांना क्वारंटाईन होण्याचे आदेश असतानाही ते सार्वजनिक ठिकाणी फिरत राहीले. त्यांनी एक नाही तर दोन लग्नाला हजेरी लावली. तीन पॉझिटीव्ह आढळून आलेले रुग्ण कुटुंबातील सदस्य बँकेत गेले, रजिस्ट्री ऑफिसमध्येही गेले.
मसरत नगरच्या या कुटुंबातील पॉझिटीव्ह आलेले रुग्ण क्वारंटाईन असताना एसबीआयच्या मुख्य शाखेत जाऊन आला. तेथील पाच कर्मचाऱ्यांशी ते अगदी जवळून संपर्कात होते. या कर्मचाऱ्यांना घेऊन ते मॉडगेज करण्यासाठी बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात जाऊन आले.त्यामुळे दुपारी ही रुग्ण पॉझिटीव्हची असल्याची बातमी बीडमध्ये सर्वत्र पसरताच बँकेने तातडीने सर्व व्यवहार बंद करत असल्याचे जाहीर केले.
बराच काळ ते बीडच्या काही मुंद्राक विक्रेत्यांना देखील भेटल्याची चर्चा आहे. आज हे दोघे पॉझिटीव्ह आल्यानंतर रजिस्ट्री ऑफिस तातडीने बंद करण्यात आले आहे.
हे तिघे पॉझीटीव्ह आल्याने आणि सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी फिरल्याने यांच्याशी अनेक लोकांचा जवळून संपर्क आल्याने बीड शहरामध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण
पसरले आहे.

काळजी घ्या…जनसंपर्क टाळा…स्वस्थ रहा!!!