केज- आज पुन्हा 1 पॉझिटीव्ह
बीड (केज)- दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबधीत रुग्णांच्या
संख्येमुळे बीड जिल्हावासियांचा जीव टांगनीला लागला आहे.आज केज तालुक्यातील उमरी येथे 23 वर्षीय मुलगा पॉझिटीव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
केज मध्ये आढळलेला रुग्ण ठाणे येथून आलेला आहे. तो शेतात 14 दिवस क्वारंटाईन होता. तो इतरांच्या संपर्कात नव्हता मात्र तो कुटुंबियांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे.
बीडमध्ये आता 19 एक्टीव्ह रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 2 औरंगाबाद आणि एक पुणे येथे उपचार घेत आहेत.
आतापर्यंत 82 जणांची नोंद कोरोना पॉझिटीव्ह आहे.त्यातील 2 मयत आणि 61 जणांना डिस्चार्ज झालेला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा!