बीड

बीड:मसरत नगर आणखी 2 पॉझीटीव्ह!

बीड : सलग दुसऱ्या दिवशी बीड़वासियांकरिता धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल प्रलंबीत असलेल्या 27 रिपोर्टपैकी 2 पॉझिटीव्ह आले असून उर्वरित सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेले दोन्ही रुग्ण बीड शहरातील मसरत नगरमधीलच आहेत.
जिल्हाभरातून एकाचवेळी 130 स्वॅब पाठविण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जिल्हावासियांच्या नजरा या रिपोर्टकडे लागलेल्या होत्या. काल 103 अहवाल प्राप्त झाले होते.त्यातील 100 निगेटीव्ह तर बीड शहरातील मसरत नगरचे 3 पॉझिटीव्ह आढळले होते. काल 27 प्रलंबीत रिपोर्टपैकी आज 2 पॉझिटीव्ह आले आहेत.
काळजी घ्या…गर्दी टाळा…स्वस्थ रहा!