News

बीड: मोठा धक्का: 3 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

बीड:- अवघ्या बीड जिल्ह्याचे लक्ष ज्या आहवालाकड़े लागले होते तो आहवाल आलेला आहे. चिंताजनक गोष्ट म्हणजे 130 स्वॅब पैकी 3 स्वॅब पॉझिटीव्ह,25 स्वॅब प्रलंबीत तर 102 स्वॅब निगेटिव्ह आलेले आहेत.आज 3 रुग्ण कोरोनाबधीत असल्याने बीड शहराला मोठा धक्का बसला आहे.
बीड शहराच्या मसरत नगर भागातील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील 3 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. बीडच्या अहवालातील २५ अहवाल प्रलंबित आहेत. तर १०२ अहवाल निगेटिव्ह असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.
केवळ आणि केवळ प्रशासनाच्या नियमांचे पालन न केल्याने,निष्काळजीपणाने सर्वत्र फिरल्याने,कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्यामुळे लग्न,वाढदिवस,अंत्यविधि होईल तितके टाळा.विनाकारण बाहेर पडू नका.
काळजी घ्या…गर्दी टाळा.. स्वस्थ रहा…!