महाराष्ट्र

…तर मुंबई पुन्हा होऊ शकते “बंद”

मुंबई 10 जून:  जवळपास अडीच महिन्यांनंतर मुंबई आणि राज्यातले व्यवहार पुन्हा सुरळीत करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त गर्दी मुंबईत होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. लोक अनावश्यक घराबाहेर पडत राहिले, गर्दी करत राहिले तर लॉकडाऊनमध्ये दिलेली सुट परत घ्यावी लागले. म्हणजेच पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी आज दिलेत.

8 जून पासून जवळपास सर्वच व्यवहारांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गेली दोन दिवस मुंबईत पुन्हा एकदा ट्राफिक जाम अनुभवायला मिळालं. वाहनांची प्रचंड गर्दी झाली. लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले. सोशल डिस्टन्सिंगचं पालनही होत नसल्याने सरकारची चिंता वाढली आहे.