महाराष्ट्र

महाराष्ट्र पुन्हा हादरला!24 तासांत 3254 नवे रुग्ण

मुंबई 10 जून: कोरोना रुग्णांच्या संख्येने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. राज्यात आज तब्बल 3254 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत आत्तापर्यंतचे सर्वात जास्त मृत्यू झालेत. मुंबईत आज तब्बल 97 जणांचा कोरोनामुळे प्राण गेला. तर राज्यात आज  149 जणांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 94041 वर गेली आहे. तर 1879 जणांचा डिस्चार्ज मिळालाय. राज्यात अॅक्टिव्ह केसेस 46074 आहे. मुंबईत आजची वाढ 1567 एवढी झाली आहे. तर  मुंबईतील रुग्णांचा एकूण आकडा  52667 वर गेला आहे. राज्यात कोरोनामुळे एकूण 3438 जणांचा मृत्यू झाला आहे.