महसुलच्या कर्मचाऱ्यांसह पोलिस अधिकाऱ्यांवर दगडफेक
गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाणे हद्दीतील कोलतेवाडी येथे भुमि अभिलेख विभागाचे उपअधिक्षक यांच्या आदेशावरून मंडळाधिकारी अमोल कुरूलकर, भुमापक असद खान पठाण, पीएसआई एस.जी.माने, सहाय्यक फौजदार माने, पोना.राऊत, पोलिस शिपाई खंडागळे, तडवी, गायकवाड, राहटवाड, घोषीर हे सरकारी रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खुला करत असतांना सुभाष गोपिनाथ पवार हा त्याठिकाणी हातात विषाची बाटली घेवुन आला. ‘मी औषध पिलो आहे’ असे म्हणुन मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागला. त्याचा आरडाओरडा ऐकुन महसुलच्या कर्मचाऱ्यांसह पोलिस अधिकारी त्यांच्या दिशेने जात असतांना त्याठिकाणी आलेल्या 15 ते 20 जणांनी महसुलच्या कर्मचाऱ्यांसह पोलिस अधिकारांच्या दिशेने दगडफेक केली.जेसीबीवरही दगडफेक करून त्याच्या काचा फोडल्या.
सदरील प्रकारानंतर त्या दोन्ही गटात हाणामाऱ्या सुरू झाल्या. व्यवस्था कायदा अतंर्गत तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी सुधाकर कोकरे, शुभम पांढरे, प्रदीप सांगवे, सिद्धार्थ पटेकर, महेश पटेकर, पांडुरंग पवार, मधुकर घोडेराव या सात जणांना अटक केली आहे.पोनि.सुरेश उनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुभाष माने हे करत आहेत