किरकोळ कारणावरून पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला
गेवराई : आस्तिक लादे हे शिरुर तालुक्यातील वडाचीवाडी येथील रहिवासी असून सोलापूर येथील पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ते मागील दहा-बारा दिवसापूर्वी मेडिकल रजा टाकुन आपल्या वडाचीवाडी या मुळ गावी आलेले आहेत.रविवार दि.7 रोजी त्यांना गावातील रामनाथ लादे, राहुल लादे, नागरगोजे, संजय लादे, दिलीप लादे, चंद्रकांत नागरगोजे व बारीकराव लादे यांनी पोलिस कर्मचारी यांना एकांतात गाठून तुझे आई-वडील व भाऊ तुझे आई-वडील, भाऊ हे आमच्या शेतातून का वागतात म्हणून पोटात चाकुचा वार केल्याने या हल्ल्यात लादे हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच यावेळी आस्तिक लादे यांचे आई, वडील व भाऊ हे भांडण सोडण्याठी आले असता त्यांना देखील बेदमपणे मारहाण करत जखमी करुन आरोपी हे घटनास्थळावरुन पळून गेले. दरम्यान आस्तिक लादे यांना जखमी अवस्थेत बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.