महाराष्ट्र

सावधान!पिपीई किट,मास्क बांधून चोरट्यांच्या चोऱ्या सुरु

जालना – दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या वाढत्या संख्येने जनता आणि प्रशासन त्रस्त आहे.यामध्ये कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स या कोविड योध्यांचे कवच असलेल्या पीपीई किट, मास्कचा गैरवापरची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.आता चोरट्यांनी चक्क पिपीई किट,मास्क बांधून लॉकडाउनच फायदा उचलत मध्यरात्री चोरट्यांनी पिपीई किट आणि मास्क बांधून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरात चोरट्यांनी एका खाजगी कंपनीचे एटीएम आणि बँकिंग ग्राहक सेवा केंद्राचे एटीएम फोड्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मशीन उघडत नसल्याने जवळच असलेल्या समृद्धी ग्राहक सेवा केंद्राचे शटर फोडून 22 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना देखील उघडकीस आली आहे.