बीड

देवा काळजी घे!130 स्वॅबची प्रतीक्षा

बीड : आज निश्चितच बीड जिल्हावासियांचे हृदयाचे ठोके वाढवून जाणारा दिवस आहे कारण
आज बीड जिल्ह्यामधून तब्बल 130 स्वॅब अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोग शाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. या स्वॅब रिपोर्ट सायंकाळी साडेसातपर्यंत येण्याची शक्यता आहे.आजचा दिवस बीड जिल्हावासियांकरिता महत्वाचा आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज पाठविण्यात आलेल्या स्वॅबमधील माजलगाव आणि बीडमधील अति संपर्कातील लोक आहेत. माजलगावच्या देशपांडे हॉस्पिटलमध्ये धारूरच्या अंबेवडगावच्या रुग्णाने उपचार घेतले होते. त्यामुळे येथील डॉक्टर, स्टाफ व इतर असे 58 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. तर बीड शहरातील झमझम कॉलनीतील एक चालक हैद्राबादहून आल्यानंतर पॉझिटीव्ह आढळून आला होता. तो ज्यांना घेऊन गेला ते लोकही दोन दिवसांपुर्वीच पॉझिटीव्ह आढळून आले.बीड जिल्हावासियांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून पुन्हा बीड मध्ये कर्फ्यू लागतो कि काय अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा… स्वस्थ रहा…प्रशासनाच्या नियमांचे पालन करा!