Newsक्राईम

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दोघांना लुटले

पाथर्डी: डोक्याला रिवाल्वर लावून दोघांना लुटल्याची घटना फुंदे टाकळी फाट्यावरील पुलाजवळ  घडली. सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , फुंदे टाकळी येथील वैष्णव पोपट फुंदे व अंगद बाबासाहेब फुंदे हे फुंदे टाकळी गावातून अँक्टिवा मोपेड क्र. एम एच 16 सी. एस. 3295 या गाडीवरून पाथर्डी कडे जात असताना त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाची  होंडा शाइन  मोटारसायकवर दोन अनोळखी इसम तोंड बांधून आले. पाठीमागून आलेल्या  आरोपीनी  वैष्णव पोपट फुंदे याच्या डोक्यास रिव्हाल्वर तर पोटास चाकू लावला त्याच्या जवळील पाच हजारांची रोख रक्कम.तर अंगद बाबासाहेब फुंदे याला हि धाक दाखवून त्याच्या कडील मोबाईल व गळ्यातील दीड तोळ्यांची सोन्याची चैन असा  ऐवज जबरीने चोरून चोरट्यांनी पोबारा केला. याबाबत फुंदे यांच्या फिर्यादीवरून  दोन अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच  उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे ,पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी घटनास्थळी भेट दिली.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करत आहेत.