संतोष खोटे यांच्यावरील केलेल्या हल्ल्यात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
आष्टी (प्रतिनिधी)
मुगगाव येथील भारतीय लष्करात काम केलेले जवान संतोष खोटे यास गावातीलच गुंडांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने गळा दाबून नाक तोंड दाबले आणि डोक्यावर लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याने अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या संतोष खोटे यास परवा अंमळनेर पोलिसांनी तेथील दवाखान्यात पाठवले मात्र अत्यवस्थ असल्याने अंमळनेर येथील रुग्णालयातून त्याला तातडीने बीडच्या रुग्णालयात हलवण्यात आले. दोन दिवसांपासून खोटे हे बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. अंमळनेर पोलिसांनी याप्रकरणी संतोष खोटे यांचा जबाब घेण्यासाठी टाळाटाळ चालवली आहे अंमळनेर पोलीस स्टेशनचे जमादार आरसुळ हे जबाब घेण्यासाठी गेले असता संतोष खोटे देत असलेल्या जबाब लिहून घेण्यापेक्षा त्यांनी तुमच्यावर जीवे मारण्याचा उद्देशाने हल्ला म्हणण्यापेक्षा मारण्याची धमकी असा जबाब द्या असे म्हणत फिर्यादिवरच दबाव टाकला वारंवार खोटे हे माझा जबाब घ्या असे सांगूनही अडसूळ त्या ठिकानाहून निघून आले होते.याप्रकरणी आता थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली.याविषयी अधिक माहिती अशी की, दि. ८ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास येथील रामचंद्र धस महाविद्यालयासमोर विद्यालयासमोर संतोष खोटे व कॉलेजमधील लिपिक गहीनाथ गोरे हे कॉलेजकडे जात असताना गावातील काही लोकांनी कॉलेजच्या रस्त्यावर एम एच २३ टी ३९४२ जेसीबी रस्ता खोदण्याचे काम करत होते हे काम अशोक खोटे, अंकुश खोटे आणि देविदास खोटे गोकुळ खोटे, सोमनाथ खोटे
(सर्व रा.मुगगाव ) हे करत होते.यावेळी संतोष खोटे यांनी आपल्या गावातील मुले या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत आपण रस्ता का खोदतात्यांची गैरसोय होईल त्यांना अडथळा होईल असे म्हणल्यास म्हणताच गोकुळ खोटे व अंकुश खोटे यांनी संतोष खोटे यांचे नाक तोंड दाबले व सोमनाथ खोटे यांनी त्यांचे पाय खाली ओढून खाली पडून त्यांचे नरडे व तोंड दाबले आणि तिथे असलेल्या देविदास मारुती खोटे त्याने त्यांच्या हातातील लोखंडी सळईने जीवे मारण्याच्या उद्देशाने संतोष खोटे यांच्या डोक्यावर जबर मारहाण केल्याने ते अत्यवस्थ झाले गावातील काही जणांनी सोडण्याचा प्रयत्न केला असता वरील सर्वजण व त्यांचे अन्य सहकारी ऐक न्याच्या मनस्थितीत नव्हते संतोष खोटे यांचे चुलते व अन्य सोडण्यासाठी आले होते त्यांनाही मारहाण केली याप्रकरणी संतोष खोटे यांना जबर मार लागला परमेश्वर किसन खोटे व इतरांनाही जबर जखम झाल्यामुळे हे अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले असता तेथील पोलिसांनी संतोष खोटे यांना जबर मार लागला असल्याने त्याला दवाखान्यात घेऊन जाण्याबाबत सांगितल्याने अमळनेरच्या दवाखान्यात नेले असता मोठ्या प्रमाणात मार लागल्याने त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले गेल्या दोन दिवसापासून त्या ठिकाणी ते उपचार घेत आहे हे सर्व कृत्य संतोष खोटे यांना जीवे मारण्याच्या प्रकरणातून झाल्याचे पोलिसांना संतोष खोटे यांनी सांगितले मात्र जवाब घेण्यासाठी गेलेल्या जमादार आरसुळ यांनी आपण असा जबाब देऊ नये असे म्हणत त्या ठिकाणाहून निघून आले याप्रकरणी संतोष खोटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे काल सायंकाळी तक्रार दिली असून मला मोठ्या प्रमाणात मारहाण होऊन माझा जीव कसाबसा वाचला असताना माझा खरा जबाब घेण्या पेक्षा अंमळनेर येथील पोलीस माझ्यावरच दबाव आणत आहेत.याबाबत माझी खरा जबाब नोंदवून घ्यावा अशी मागणी केली आहे माझ्यावर दबाव आणून मला मारहाण करणाऱ्यांना वाचविण्याच्या हिशोबाने तक्रार घेत असल्याचा तक्रारी अर्ज दिला आहे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या आरोपीवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.