बीड

माजलगाव- 58 संशयितांच्या स्वॅबची प्रतीक्षा

माजलगाव : माजलगाव शहरातील नामांकित देशपांडे हॉस्पिटल मधील 58 संशयितांची स्वॅब आज रात्री किंवा उद्या सकाळी घेतले जात असून बुधवारी (दि.१० ) रोजी त्यांचा अहवाल येणार आहे.
धारूर तालुक्यातील अंबेवडगावचा मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीने डॉ.देशपांडे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते.त्याचा संशय आल्याने स्वब घेतला असता तो पॉझिटीव्ह आढळून आला.डॉक्टरांनीही त्याच्यावर जवळपास ४ दिवस उपचार केले होते.या व्यक्तीच्या कुटुंबा मधील चौघे पॉझिटीव्ह आढळून आले होते.आता मझलगाव मध्ये राहणाऱ्या रहिवास्यांना देशपांडे हॉस्पिटल मधील ५८ संशयितांच्या स्वॅबची चांगलीच प्रतीक्षा लागून आहे.
काळजी घ्या… गर्दी टाळा…स्वस्थ रहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!