बीड

बीड:मसरत नगर भागातील ४३ संशयितांचे स्वॅब घेण्यात येणार

बीड : बीड मधील मसरत नगर भागातील तिघांनी क्वारंटाईन असतानाही एका लग्नसमारंभास उपस्थिती लावल्याने या तीन पॉझिटीव्ह रुग्णांनी बीड जिल्ह्याची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. या तिघांचं कुटुंब मोठं असल्याने त्या कुटुंबातील संशयित असलेल्या 43 जणांचे स्वब तपासणीसाठी घेण्यात येत असून उद्या त्याचा अहवाल येणार आहे.हे तिघे आणि सोबत एक ड्रायव्हर असे चौघेजण हैद्राबादला जाऊन आले होते. त्यातील गाडीचा ड्रायव्हर तीन दिवसापूर्वी स्वॅब तपासणीत पॉझिटीव्ह आढळून आला. त्यानंतर चालकांला घेऊन गेलेल्या तिघांना क्वारंटाईन होण्याचे आदेश दिले होते. शिवाय स्वॅब तपासणीत काल त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.त्यामुळे या तिघांच्या संपर्कातील संशयित 43 जणांचे स्वॅब उद्या पहाटे घेतले जाऊन सायंकाळी रिपोर्ट येईल. या मधील एका रुग्णास इतर काही आजार असल्याने त्याने औरंगाबादेत उपचार्थ पाठवण्यात आले आहे.होम क्वारंटाईनचे आदेश मोडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल होतो की नाही याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

काळजी घ्या…गर्दी टाळा …स्वस्थ राहा…प्रशासनाच्या सूचनेचे पालन करा!