बीड

बीड: शिंगणवाडी येथील दोघेही निगेटीव्ह

किल्लेधारुर दि.९(प्रतिनिधी) तालुक्यातील शिंगणवाडी येथील दोघांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असून दोघेही निगेटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

किल्लेधारुर तालुक्यातील शिंगणवाडी येथे पुण्याहून आलेल्या दोन जणांना कोरोना लक्षण आढळल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मोहखेड येथील वैद्यकीय अधिकारी यांनी स्वॕब तपासणी करिता केज येथे पाठवले होते. त्यांचे स्वॅब आज घेण्यात येऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असून दोघेही निगेटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी दिली.