अरविंद केजरीवाल यांना कोरोना नाही;
9 जून : गेल्या दोन दिवसांपासून ताप आणि इतर लक्षणं दिसत असल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला क्वांरंटाइन करून घेतलं होतं. त्यांची सकाळी COVID-19 चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आता आला असून केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे.