बीड

ज्योतिरादित्य शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल

भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या मातोश्री माधवीराजे यांना कोरोना सदृश लक्षणं आढळल्यानं दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी म्हणजे 8 जूनला दोघांची कोरोना टेस्टही करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांचे रिपोर्ट आलेले नाहीत.

दिल्लीतल्या साकेत परिसरातल्या मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये ज्योतिरादित्य आणि त्यांच्या मातोश्री यांना दाखल करण्यात आलं. रविवारपासूनच दोघांची तब्येत काहीशी बिघडली होती. घशात खवखव आणि ताप आल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.पण ज्योतिरादित्य यांच्या निकटच्या वर्तुळातून मात्र अद्याप टेस्टचा रिपोर्ट आला नसल्याचं सांगितलं जात आहे. हॉस्पिटल प्रशासनाकडूनही त्यांच्या आरोग्याबाबत अद्याप कुठलं अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाहीय.