4 पॉझिटीव्ह रुग्णांच्या कुंटूबाची अन्नपाण्यासाठी फरफट
गेवराई , दि. ९ (कैलास हादगुले):- गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने मंगळवार पासून प्रशासनाने पुर्ण गावात संचारबंदी अधिक कडक करत उपाय योजना आखल्या आहेत.अशातच याच गावातील पाॅझिटिव्ह रुग्णाची पत्नी व दोन मुलांना बीड जिल्हा रुग्णालयातून मंगळवारी सकाळी डिस्चार्ज केले.या तीन जणांना रुग्ण वाहिकेतून मालेगाव येथे पाठविले,माञ गावक-यांनी या लोकांना गावात प्रवेश दिला नाही.परिणामी राहण्यासाठी व जेवणासाठी या कुंटूबातील लोकांनी उमापूर व गेवराई पोलिस स्टेशन तसेच तहसील कार्यालयात धाव घेतली.या सर्व ठिकाणी या लोकांना उडवा उडवीचे उत्तरे मिळाल्याने दिवसभर गेवराई तालुक्यात अन्न व पाण्यासाठी फरफट होताना दिसून आले.भर उन्हात हे कुंटूब दोन मुलासह रुग्ण वाहिकेतून या शासकीय कार्यालयातून त्या शासकीय कार्यालयात आमच्या राहण्याची व जेवणाची सोय करा म्हणून शासन दरबारी न्याय मागताना दिसून येत होते.माञ आधिकारी व कर्मचारी त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करताना दिसून आले.मालेगाव येथे चारिही बाजूने रस्ते गावक-यासह प्रशासनाने बंद केली आहेत.अशा परिस्थितीत या फरफट करणा-या कुंटूबातील लोकांना गावात प्रवेश बंद केल्याने प्रशासन व गावकरी आता काय भुमिका घेतात याकडे संपूर्ण गेवराई तालुक्याचे लक्ष लागले आहे. गेवराई तालुक्यातील मालेगाव येथे पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने गेवराई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.या रुग्णांवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तसेच गेवराई व जिल्हा प्रशासनाने त्या रुग्णाची पत्नी व दोन मुलांना ३ जुनला उपचारासाठी बीड रुग्णालयात दाखल केले.या ठिकाणी उपचार घेऊन व डिस्चार्ज केल्याचे व निगेटिव्ह रिपोर्टचे पञ घेऊन हे तीन जण मंगळवारी सकाळी आकराच्या सुमारास मालेगाव येथे रुग्ण वाहिकेतून गेले.माञ गावक-यांनी या लोकांना गावात प्रवेश दिला नाही.गावात बंदोबस्तासाठी विविध विभागाच्या आधिकारी व कर्मचारी यांच्याकडे या तीन सदस्यानी दाद मागितली,परुंतू त्यांना उडवा उडवीचे उत्तरे मिळाली.त्यामुळे येथे काहीसा वाद विवाद झाला.आमच्या राहण्यासाठी व जेवणासाठी शासनाने सोय करावी यासाठी हे लोक उमापूर व गेवराई पोलिस स्टेशन मधे देखील न्याय मागण्यासाठी आल्याचे रुग्ण वाहिका चालकाने आमचे प्रतिनिधी कैलास हादगुले यांच्याशी बोलतांना सांगितले.तदनंतर हे लोक गेवराई तहसील कार्यालयात आले.याठिकाणी रुग्ण वाहिका चालकाने पञकार यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार जोशी यांच्याकडे कैफीयत मांडली.माञ येथे देखील गावकरी व शासनाच्या काही लोकांना जोशी यांनी विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तरे मिळाली.अखेर हे कुंटूबातील लोक भर उन्हात आपल्याला काय व्यथा होऊ लागल्या हे डोळे पानावून सांगताना मन हेलावून गेले. दरम्यान या पाॅझिटिव्ह रुग्ण याच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरु आहेत.पत्नी व दोन मुलांवर बीड येथे उपचार करण्यात आले.अवघ्या सहा दिवसात जिल्हा प्रशासनाने या तीन जणांना डिस्चार्ज व उपचार करुन प्रमाणपञ दिलेले आसताना प्रशासनाने त्यांना त्यांच्या घरा पर्यंत नेणे बंधनकारक आसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.माञ प्रशासनाने त्यांना अर्धावरच वा-यावर का सोडले हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रशासनाने यांची राहण्यासाठी व जेवणासाठी सोय करणे अशा संकटकाळी काळाची गरज आहे.माञ प्रशासन दुर्लक्ष करत आसल्याचे मंगळवारी दिवसभर या कुंटूबातील लोकांकडे बघून आल्यानंतर दिसून आले आहे.या तीन सदस्यानी आमच्या जेवणासाठी व राहण्यासाठी सोय करावी ही एकमेव मागणी दिवसभर शासन दरबारी केली आहे.आता शासन व मालेगाव येथील नागरिक काय भुमिका घेतात याकडे आता संपूर्ण गेवराई तालुक्याचे लक्ष लागले आहे.