संतोष देशमुख हत्या ही राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी ही घटना आहे
— ना. रामदास आठवले
केज :- संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समाजाला राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारे घटना असून या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यात यावा. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्र्याची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दि. ३० डिसेंबर रोजी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, बाबुराव कदम, मिलिंद शेळके यांच्यासह रिपाईचे नेते उपस्थित होते
बीड जिल्ह्यातील मस्साजोग तालुका केज येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी आहे तसेच यां घटनेपूर्वी पवन ऊर्जा प्रकल्पात घडलेल्या घटनेची येथील सुरक्षा रक्षाच्या मारहाणीची प्रकरणी पोलिसांनी ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करून घेतली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असती म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त होत आहे. या घटनेतील गुन्हेगारांची प्रॉपर्टी जप्त करून भागणार नाही तर यातील आरोपींना पकडणे आवश्यक आहे. चार आरोपी पकडले असून अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. इतर आरोपी ताब्यात घ्यायला एवढा वेळ लागतो ? महाराष्ट्र पोलीसासाठी ही चांगली नाही पोलिसांनी दवाखाली काम करू नये. हे जे प्रकरण आहे ते अत्यंत गंभीर आहे. सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे हा सोलार प्रकल्पात काम करीत होते त्यांना मारहाण झाल्यामुळे
संतोष देशमुख हे भांडण सोडवायला गेले होते. त्यामध्ये ॲट्रॉसिटी लावणे अत्यंत आवश्यक होते. जर ॲट्रॉसिटी लावली असती आणि आरोपींना पकडले असते तर ही घटनाच घडली नसती. यामुळे पोलीसावर लोकांचा संशय आहे. हे अत्यंत गंभीर आहे. केज आणि बीड येथील पोलिसांवर लोकांचा संशय आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली झालेली आहे. नवीन आलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालावे. यासंदर्भात मी या सदर्भात मी त्यांच्याशी बोलणार आहे. असे रामदास आठवले म्हणाले.
तसेच मुख्यमंत्र्यांशी देखील ते बोलणार आहेत. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. संतोष देशमुख यांची आई आणि त्यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतले आहे. या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची आणि रिपब्लिकन पार्टीची मागणी आहे. असे तेंमहबके. तर या प्रकरणी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची देखील भेट घेणार आहेत. परंतु त्या अगोदर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी आणि त्यांचे मास्टरमइंड यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. ही घटना घडवून २१ दिवस लोटले आहेत. तरी अद्याप पर्यंत सर्व आरोपी अटक झालेले नाहीत. हे आश्चर्य आहे. अद्याप पर्यंत पोलिसांनी देशमुख यांच्या कुटुंबीयातील कोणाचेही स्टेटमेंट घेतलेले नाही. घटना घडल्या नंतर पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये पोलिसांनी त्यांचे स्टेटमेंट घेणे आवश्यक होते. अशा प्रकरणांमध्ये त्या कुटुंबाचे लवकरात लवकर स्टेटमेंट घेतले जातात पण पोलिसांनी त्यांचे लवकरात लवकर विनाविलंब स्टेटमेंट घ्यावे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून उर्वरित सर्व आरोपी यांना तात्काळ ताब्यात घेण्यात यावे. त्या आरोपींना पकडलेच पाहिजे अशी आमची भूमिका असून सर्व आरोपी आणि त्याचा सूत्रधार यांच्या अटकेची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
यावेळी त्यांच्या सोबत राजू जोगदंड, महावीर सोनवणे, अशोक साळवे, किशोर कांडेकर, अविनाश जावळे, किसन तांगडे, मझर खान, सुरेश माने, रविराज माळाळे, मायाताई मिसळे, राणी गायकवाड, गोवरर्धन वाघमारे, उत्तम आप्पा मस्के, बापू पवार, सादेक कुरेशी, भाई उजगरे, महादेव उजगरे, अरुण निकाळजे, अरुण भालेराव, दीपक कांबळे, धोंडीराम सिरसट, प्रमोद दासुद, सुभाष तांगडे, संदीपान डोंगरे, राहुल सरवदे, अविनाश जोगदंड, सतीश शिनगारे, प्रभाकर चांदणे, विलास जोगदंड, शाम विर, नागेश दुबळे, भाऊसाहेब दळवी, रतन वाघमारे, संभाजी गायकवाड, ईश्वर सोनवणे, राजेश सोनवणे, अक्षय कोकाटे, धम्मा पारवेकर आणि दिलीप बनसोडे, रवी जोगदंड, गौतम बचुटे, सूरज काळे, हरेंद्र तूपारे, प्रशांत हजारे, हरीश गायकवाड, दादाराव धेंडे, विनोद शिंदे, रोहित कांबळे, रोहित बचुटे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.