जालना: नविन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे
जालना: आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांनी गोंदिया, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्य सरकारने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आणि शैलेश बलकवडे यांची जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. शैलेश बलकवडे यांनीही तातडीने पदभार स्वीकारला आहे. जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा आढावा आता नवीन एसपी शैलेश बलकवडे घेत असल्याची माहिती आहे.