जागतिक महासत्ता बनण्याकडे भारताचं फार मोठं पाऊल
चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल पंकजाताई मुंडेंनी केले पंतप्रधान मोदींसह शास्त्रज्ञांचं अभिनंदन
मुंबई दि. २३: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान मोहिम यशस्वी करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब तर आहेच पण त्याचबरोबर ही कामगिरी भारताची जागतिक महासत्ता बनण्याकडे फार मोठं पाऊल आहे अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मोहिम यशस्वी करणाऱ्या शास्त्रज्ञांसह भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे.
आज सर्वांच्या आनंदाला त्याचप्रमाणे आपल्या नवीन भारताच्या त्याच्या सन्मानाला आणि त्याने केलेल्या विश्व विक्रमालाही कुठलीही सीमा राहिलेली नाही आपण जगाच्या नव्हे तर आता विश्वाच्या सीमा गाठलेल्या आहेत. देशाच्या इतिहासात पन्नास वर्षे प्रयत्न केल्यानंतर चांद्रयान तीन हे यशस्वी झालं आहे. हा आपल्यासाठी गौरवाचा विषय आहे. देशाचा प्रत्येक नागरिक आज सन्मानाने डौलत आहे. भारत जगाची सत्ता बनण्याकडे हे फार मोठं पाऊल आहे. मी आपल्या सर्वाच्या आनंदात सहभागी आहे. चांद्रयान मोहिम यशस्वी करण्यामागे अनेक हात आहेत, या सर्वांचे तसेच शास्त्रज्ञ आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या भारत सरकारचे आणि पंतप्रधान मोदींचं मी अभिनंदन करते असं पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे.