24 तासांत रेकॉर्ड ब्रेक!
नवी दिल्ली, 09 जून : देशभरात अनलॉक 1.0 अंतर्गत सोमवारपासून मॉल, हॉटेल आणि धार्मिक स्थळं खुली करण्यात आली. देशात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली असली तरी, कोरोनाबाधितांच्या संख्येत मात्र वाढ होतच आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 9987 नवीन रुग्ण आढळून आले तर 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 2 लाख 66 हजार 598 झाला आहे. मात्र असे असले तरी भारतासाठी ही चिंतेची बाब नाही आहे. याचं कारण आहे भारताचा रिकव्हरी रेट.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात 1 लाख 29 हजार 971 सक्रीय प्रकरणं आहेत. तर, 7466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 29 हजार 214 रुग्ण निरोगी झाले आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 48.46% आहे. त्यामुळं भारतासाठी ही चांगली बाब आहे.