News

खळेगावच्या तलाठ्यास २२० रुपायांची लाच घेताना गेवराईत रंगेहात पकडले

गेवराई , दि.९ (कैलास हादगुले):- गेवराई शहरातील ताकडगाव रस्त्यावर असलेल्या रूची भोजनालया मध्ये सोमवारी रात्री जमिनीचा सातबारा देण्यासाठी शेतकऱ्याला २२० रुपायांची लाचेची मागणी करणारा तलाठी पकडला आहे.
जमिनीचा ७ बारा व ८ अ चा उतारा देण्यासाठी तलाठी दादासाहेब सुखदेव आंधळे वय (३४) असे या तलाठ्याचे नाव आहे.खळेगाव येथील सज्जाचा हा तलाठी असल्याचे समजते.त्यांनी तक्रारदार जमिनीचा ७ बारा व ८ चा उतारा यासाठी लाच मागितली होती,२२० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरील तलाठी दादासाहेब आंधळे यास रंगेहात पकडले. याप्रकरणी तक्रारदार कैलास नारायणराव ढोले यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेवराई येथील महसूल प्रशासन सध्या भ्रष्टाचाराने गाजले आहे. नुकत्याच झालेल्या रेशन घोटाळ्यात गोदामपाल संजय राजपूत यास अटक करून निलंबित करण्यात आले होते.पुरवठा अधिकारी तथा नायब तहसीलदार अशोक भंडारी यास घोटाळाप्रकरणी जेरबंद करण्यात आले होते.काही दिवसापूर्वी वाळू तस्करीच्या प्रकरणात लाच घेताना नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे यांना रंगेहात पकडले होते.त्यामुळे गेवराईचे महसूल प्रशासन भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडले आसल्याचे दिसून येत आहे.