बीडमहाराष्ट्र

भगवान पुरुषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर – पुरुषोत्तमपुरी

माजलगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथील गोदावरीच्या पात्रात उध्वस्त मंदिराचे पुरातन अवशेष सापडले. माजलगांव पासून २२ कि.मी.अंतरावर असणा-या गोदावरीच्या काठावर असलेल्या पुरुषोत्तमपुरी हे पुरुषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर आहे. भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर गोदावरी नदीच्या पोटावर वसलेलं आहे. तीव्र दुष्काळामुळे गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. कोरड्या पडलेल्या या पात्रात काही पूरातन अवशेष सापडले. त्यात स्तंभशीर्ष, स्तंभस्थळ, जांघा भागेवरील कोरीव दगडे व मंदिराच्या तळाशी विविध घडीव शिळांच्या समावेश आहे याच अवशेषात एक सतीची शिळा असून, ती साडेतीन फूट उंच व दोन फूट रुंद आहे. या शिळेवर एक हात दंडापासून कोरला असून तो आशिवंचनावस्थेत आहे. याच शिळेवर एकूण तीन शिल्पे कोरलेली आहेत. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी मंदिराचे स्थापत्य कलेतील वेगळेपण असे की मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या विटा चक्क पाण्यावर तरंगतात. हे मंदिर इसवी सन १३१0 मध्ये रामचंद्र देव यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने उभारले. यामुळेच या गावाला पुरुषोत्तमपुरी हे नाव पडले.आणि पुढील बांधकाम पुरुषोत्तमपुरी चे राजा खुशालचंद्र अब्बड यांच्या मुळे पूर्ण झाले, मंदिरातील मुख्य देवतेलाही याच नावाने ओळखले जाते. इतिहासाच्या दृष्टीने पुरुषोत्तमपुरीस मोठे महत्त्व असून रामचंद्र देव यादवांचा शेवटचा ज्ञात ताम्रपट इथेच सापडला आहे. आजपर्यंत उपलब्ध सर्व ताम्रपटात हा ताम्रपट वजनाने व आकारानेही मोठा मानला जातो. यात रामचंद्र देव यादवाने मंदिर उभारणीसाठी व मंदिराच्या देखरेखीसाठी पंचक्रोशीतील वृंदाना आजूबाजूची गावे दान दिल्याचा उल्लेख आहे. पुरुषोत्तमपुरी महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनात श्रावण महिन्यात माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरीत पुरूषोत्तमाच्या दर्शनास जातात. अधिक मासात या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गोदाकाठी राक्षसभूवन, पुरूषोत्तमपुरी, मंजरथ, गंगामसला येथे प्राचीन मंदिरे आहेत. त्यात पुरूषोत्तमपुरीचे मंदीर उल्लेखनीय ठरते. गोदावरीच्या पात्रात पूर्व पश्चिम प्रवाहात जवळपास हजार फूट अंतरापर्यंत हे अवयव अस्ताव्यस्त पसरले आहेत. यात स्तंभशीर्ष, स्तंभतळ, मंदिरावरील कोरीव दगडे व मंदिराच्या तळाच्या विविध भागातील घडीव शिळांचा समावेश आहे. या अवशेषात एक सतीची शिळा सापडली असून ती साडेतीन फूट उंच व दीड फूट रंद आहे. या शिळेवर एक हात दंडापासून कोरला असून तो घोट्यापासून 90 अंशात सरळ वर आशिर्वचनावस्थेत आहे. हाताखालची धावत्या घोड्यावर स्वार व्यक्तिचे शिल्प असून घोड्याचा लगाम धरलेली व्यक्ति पुढे धावते आहे. या शिल्पाखाली पुन्हा तिसरे शिल्प असून त्यात स्त्री पुरुषास निद्रावस्थेत दाखविण्यासाठी आडवे कोरले आहे. विशेष म्हणजे नदीपात्रात एका प्राचीन घाट उघडा सापडला असून हा घाट यादवांच्याही अगोदरच्या काळातील असावा.अंदाज जिल्ह्यातील इतिहास संशोधक डॉ. सतीश साळूंके यांनी पुरूषोत्तमपुरी येथे भेट देऊन पाहणी केल्यानंतर केला. पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तम मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात. झुंबरलाल अब्बड हे पुरुषोत्तमपुरी चे मुखिया होते त्यावेळेस सदर पुरुषोत्तम मंदिर ही पूर्वी कुठेही शासन दरबारी नोंद नव्हती. वर्षे 1980 ला श्री. बाबुराव सहदेव गोळेकर रा.पुरुषोत्तमपुरी ता. माजलगाव जिल्हा बीड यांनी पुरुषोत्तम देवस्थान विश्वस्त संस्था नोंदणीकृत केली. बाबुराव सहदेव गोळेकर हे पुरुषोत्तम देवस्थान विश्वस्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

संपुर्ण भारतात पुरुषोत्तमाचे मंदिर फक्त पुरुषोत्तमपुरी येथेच आहे. पुरुषोत्तम मास म्हणजे अधिकमास अर्थात धोंड्याचा महिना किंवा मलमास, धोडेमहात्मे या पवित्र ग्रंथात वर्नीत्याप्रमाने सालातील चारा महिन्यांचे बारा भगवंत स्वामी आहेत. मात्र सर्वांचा मीळुन उरी सुरी बनलेल्या अधिकमासचे स्वामीत्व कोनीच स्विकारेना, ते पुरुषोत्तमाने स्विकारले. या गावी दक्षिण गोदातीर्थ आहे . त्यास चक्रतीर्थ आसे म्हणतात. त्याची आख्यायिका अशी, पूर्वी शार्दुल नावाचा दानव मातला पंचकोशीतील जनतेला तो फार त्रासु लागला. विष्णू भगवंताने पुरुषोत्तमाचा अवतार घेऊन त्याचा सुसुदर्शन चक्राने शिरछेद केला. ते सुर्शन चक्र गोदावरीत धुतले. म्हणुन आजही हे तीर्थ चक्रतीर्थ म्हणुन प्रसिद्ध आहे. भाविक या चक्रतीर्थत स्नान करतात. स्नान केल्यानंतर शंक, गदा, तथा पशुधारीसावळ्या विठ्ठलाचे अर्थात पुरुषोत्तमाचे दर्शन घेतात. या मंदिरा शेजारीच त्रिवेनी संगम मंदिर आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे वरदविनायक गणपतीची ४ फुट उंचीची मूर्ती, माता पार्वतीच्या पादूका आणि महालकेश्र्वर शंकराची शिव पिंड असा त्रिवेनी संगम एकाच मंदिरात इतरत्र शोधुनही सापडत नाही. या मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतीमा म्हणजे वृंदावनातील कृष्णमंदिराची प्रतीकृती आहे. येथील विशेष दोन्ही मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात. गावाच्या दक्षिणेस काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. गावापासुन पुर्वेस 9 कि. मी गोदावरी पात्रात भस्माची टेकडी आहे, त्याचा पूर्वोतिहास म्हणजे तेथे ऋर्षीचे वास्तव्य होते. त्यांनी केलेल्या यज्ञांची प्रचिती म्हणून आज ही त्या टेकडीत भस्म बघण्यास मिळतो.

अधिक मास पुरुषोत्तम मास निमित्त भगवान पुरुषोत्तमाची जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते विधीवत महापूजा करण्यात आली.