क्राईम

छेडछाडीतुन दोन गटात मारामारी एकाचा खून

आष्टी(प्रतिनिधी)
बहिणीबद्दल वाईट चर्चा केल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण केली.छातीत जोराची वीट लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी दि.९ जुन दुपारी आष्टी तालुक्यातील कानडी बु.येथे घडली.
या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.आधिक माहिती अशी की,संजय वणवळे (वय ४० रा.कानडी बु.)असे मायताचे नाव आहे.याने आरोपीच्या बहिणीची वागणूक चांगली नसल्याचे तिच्या पतीला फोन करुन सांगितले अशी खोटी माहिती का दिली ? याचा जाब विचारण्यासाठी आरोपी संजय वणवळे यांच्या घरी गेले.हा वाद इतका टोकाला केला की, या वादात आरोपीने संजयला विटाने मारहाण केली.या मारहाणीत छातीत विटांचा जोराचा मार लागल्याने संजयचा मृत्यू झाला.आरोपीच्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विजय लगारे,पो.नि. माधव सूर्यवंशी यांनी भेट दिली आहे.
याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.