News

थंडपेय घेत बसलेल्या दोघांना सहा जणांनी 15 हजार रुपयाला लुटले

अंबाजोगाईत रस्त्याच्या कडेला थंडपेय घेत बसलेल्या दोघांना सहा जणांनी 15 हजार रुपयाला लुटले  

अंबाजोगाई (प्रतिनिधी)   रस्त्याच्या कडेला थंडपेय घेत बसलेल्या दोघांना सहा जणांनी येऊन मारहान करून त्यांच्या कडील 15 हजार रुपये लुटल्या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन ला सहा जनांच्या विरुद्ध दरोड्याचा कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेतले आसुन गुन्हा दाखल झालेल्या मधील एका आरोपीची लॉक डाऊनच्या कारणास्तव जेल मधुन सुटका केल्याने तो बाहेर आलेला होता.
  या विषयी प्राप्त माहिती अशी की, पट्टीवडगाव भागातील कुसळवाडी येथील 2 ऊसतोड कामगारानी सोमवारी दुपारी अंबाजोगाई शहरात येऊन मोबाईल खरेदी केला आणि रात्री साकुड रोड वरील एका नातेवाईकाच्या घरी जेवण करून याच रस्त्याच्या कडेला येऊन थंड पेय पित बसलेले असताना या परिसरा नजीक असलेल्या अण्णाभाऊ साठे नगर मधील सहा जण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या दोघांना मारहान करून त्यांच्या जवळील 15 हजार रुपये घेऊन त्या ठिकाण हुन पळ काढला. या वेळी या दोघांनी मोटरसायकल वर त्यांचा पाठलाग केला असता त्या सर्वांनी एका आटोरिक्षा मधुन पळ काढला.     या ऑटोरिक्षा चा अर्धवट नंबर त्यांनी पोलिसांना दिला असता पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांनी सहा जना वर रवी नागनाथ आडे रा कुसळवाडी तांडा यांच्या फिर्यादी वरून सहा जणांच्या विरुद्धगु र न 203/2020 कलम 395 नुसार गुन्हा दाखल करून रातोरात तपासाची चक्रे फिरवून एम एच 23 एक्स 2338 या ऑटोरिक्षा सह 3 जणांना ताब्यात घेतले असुन तीन जण फरार आहेत. गुन्हा दाखल झालेल्या मधील एका आरोपीची लॉक डाऊनच्या कारणास्तव जेल मधुन सुटका केल्याने तो बाहेर आलेला होता. या गुन्हाचा तपास पो उ नि शिंगाडे या करत आहेत.