महाराष्ट्रक्राईमबीड

विहीरीत आढळला मृतदेह

अंमळनेर :- तालुक्यात विविध घटनेत मृतांचा आकडा वाढत असुन एकाच आठवड्यात खुन, आत्महत्या, अपघात आशा घटना घडत असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

त्यातच आज मुगगावात एका विहीरीत पुरुष जातीचा मृतदेह आढळल्याने खुन की आत्महत्या या विषयी चर्चा सुरु असुन रात्री उशिरापर्यंत अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया चालू होती.वैद्यकीय अधिकारी भोंडवे मँडम यांनी शवविच्छेदन केले.याविषयी अंमळनेर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद केल्याची माहिती बीट अंमलदार गर्जे यांनी दिली.


याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुगगावात येथील लक्ष्मण खोटे यांच्या विहिरीत एक पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती अंमळनेर पोलीस ठाण्यात कळविण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन प्रेत वर काढून त्या प्रेताचे शवविच्छेदन करण्यासाठी अंमळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहण्यात आले तिथे वैद्यकीय अधिकारी भोंडवे मँडम यांनी शवविच्छेदन केले.

सदरील विहिरीत अंतापुर येथील विठ्ठल आश्रुबा गाडे (वय ५५)यांचे प्रेत असल्याचे निष्पन्न. झाले आहे.गेल्या तिन चार दिवसापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गाडे यांनी आत्महत्या केली की त्यांचा खुन झाला असावा याची खात्री शवविच्छेदन रिपोर्ट आल्यावरच निष्पन्न होणार आहे.