भीमा-कोरेगावला न जाण्यावरून पाटलांची स्पष्टोक्ती! म्हणाले छातीवर गोळ्या…
1 Jan :- कोरेगांव-भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना धमकीवजा इशारा देण्यात आल्याने कोरेगाव भीमा येथे न जाण्याचा निर्णय चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला. यासंदर्भात ट्वीट करून त्यांनी कोरेगावं-भीमा येथे न जाण्याचे कारण स्पष्ट केले आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे. पण आज कोरेगाव भीमामध्ये लाखो अनुयायी आलेले आहे. अशावेळी कोणतेही गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची इच्छा आहे; पण लोकांची सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून विजय स्तंभाला घरूनच अभिवादन करणार आहे. विजयस्तंभ परिसर विकासासाठी शासनाने घोषित केलेल्या १०० कोटी निधीची अंमलबजावणी करणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मी दोनवेळा दिलगिरी व्यक्त केली आहे. पण तरीही माझ्या विधानाचा विपर्यास करून माझ्यावर भ्याडपणे शाईफेक झाली. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती. आताही मी भीमा कोरेगावला विजयस्तंभाच्या दर्शनाला आणि अभिवादनाला आलो तर शाईफेक करू अशी धमकी दिला आहे.
मी बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे. पण आज कोरेगाव भीमामध्ये लाखो अनुयायी आलेले आहे. अशावेळी कोणतेही गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची इच्छा आहे; पण लोकांची सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे.
आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत, त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना वंदन करून विजयस्तंभास मानवंदना देणार आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मनसुबा मी पूर्ण होऊ देणार नाही आहे. सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.