बीडच्या वैभावात भर टाकणारे ‘हॉटेल एम्पायर इन’ चौरे कुटुंबियांनी उभारले- शिवाजीराव पंडित
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
हॉटेल एम्पायरचा इन चा उदघाटन सोहळा थाटामाटात संपन्न
बीड, दि. ७ (प्रतिनिधी) :- बीड नगरीच्या वैभवात भर टाकणाऱ्या आणि अद्यावत सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या हॉटेल एम्पायर इन चा उदघाटन सोहळा बीड राजकारणातील बलाढ्य व्यक्तिमत्व म्हणून सर्वश्रुत असणारे शिवाजीराव पंडित आणि श्री क्षेत्र नारायणगडचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या उदघाटन प्रसंगी राजकीय, सामाजिक, अध्यामिक अशा अनेक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
या उदघाटन प्रसंगी शिवाजीराव पंडित आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले की, दिवसेंदिवस बीड शहराचा विस्तार वाढत चालला असून या बीड शहराच्या वैभवात भर टाकणारे आणि ग्राहकांसाठी अद्यावत सुविधांनी परिपूर्ण असणारे हॉटेल एम्पायर चौरे बंधूंनी उभा केले आहे. पिढ्यानपिढ्यापासून सामाजिक बांधिलकी जपत आलेल्या चौरे कुटुंबाचा फार मोठा इतिहास असून आता चौरे कुटुंबीय बीडकरांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने सज्ज झाले आहे याचा मला मोठा आनंद होतो आहे. या हॉटेलच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून चौरे कुटुंबीय आगामी काळात हॉटेल व्यवसायात आपली आदर्शवत छाप निर्माण करेल आणि बीडकरांच्या विश्वासास पात्र ठरेल. चौरे कुटुंबियांचा आदर्श घेऊन मराठा समाजाने देखील व्यवसायिकतेकडे वळले पाहिजे आणि एकजूट होऊन आपली प्रगती करायला हवी. चौरे कुटुंबियांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देत शिवाजीराव पंडितांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाला पूर्ण विराम दिला.
श्री क्षेत्र नारायणगडचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज आणि शिवाजीराव पंडित यांनी नारळ फोडून रिबीन कापत हॉटेल एम्पायरचा इनचे उदघाटन केले. या मंगमयप्रसंगी उपस्थितांनी चौरे कुटुंबियांचे अभिमानदं करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या उदघाटन सोहळ्यासाठी मा आमदार अजिनाथ नवले, माँ. नगराध्यक्ष दिलीप गोरे, जयसिंह पंडित, बी बी जाधव, विलास बागे, जगदीश काळे, प्रकाश सुसकर, अविनाश नाईकवाडे, चंद्रकांत नवले, नवनाथ थोटे, अनिल जगताप, अरुण डाके, शुभम धूत चौरे कुटुंबीय यांच्यासह आदींची उपस्थिती होती.