दसरा मेळाव्यात मर्यादा ओलांडू नका; पवारांचा ठाकरे, शिंदे गटाला सल्ला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
3 Oct :- ‘दसरा मेळाव्यावरून राज्यात जे काही सुरू आहे ते दुर्दैवी आहे. यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही. याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी, आमच्यासारख्या वरिष्ठ मंडळीनाही सांगावं. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही हे पाहावं’, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि शिंदे गटाला दिला.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून मुंबईमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. या मुद्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी आणि चिंता व्यक्त केली आहे. तसंच, ‘राज्यात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे.
एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत. पण त्यामुळे राज्यातल्या राजकीय वातावरण बिघडणार नाही. याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी, आमच्यासारख्या वरिष्ठ मंडळीनाही सांगावं. आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही हे पाहावं’, असा सल्लाही शरद पवारांनी शिंदे गट आणि शिवसेनेला दिला.
एकनाथ शिंदे हे काँग्रेस नेत्याकडे प्रस्ताव घेऊन गेले होते, 2014 ला शिवसेनेसोबतच्या सरकार स्थापन करण्याचा काँग्रेसचा कुठलाही प्रस्ताव असता तर मला समजलं असतं. अशोक चव्हाण काही बोललल्याचं मला तरी माहिती नाही, असंही पवार म्हणाले. दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे, तो वेगळा पक्ष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना दसरा मेळावा घेत आहे.राष्ट्रवादी त्यात काही करणार नाही’, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी आहे त्यांवर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? असं पत्रकारांनी विचारलं असता पवार म्हणाले की, ‘आम्ही कधीही अशी मागणी केलेली नाही, निर्णय राज्य सरकारने घ्यावा’ असं पवार म्हणाले.