महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

2 Oct :- मला असे अनेक फोन आले आहेत. माझ्यावर धमक्यांचा परिणाम होत नाही. मी शेवटी जनतेमधला माणूस असून जनतेत जाण्यापासून मला कोणीही रोखवू शकत नाही. पोलिस, गृहविभाग योग्य ती खबरदारी घेत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. असे कुणाला वाटले तरी कुणीही काही करू शकत नाही असे धाडस देखील त्यांनी करण्याचा प्रयत्न करू नये. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदेंना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. पोलिस सतर्क झाले असून या संबंधी तपास सुरू आहे. यापूर्वी नगरविकास मंत्री असताना माओवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर धमकीचा एक निनावी फोन देखील आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली असून त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. या आधी नक्षलवाद्यांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धमकी आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

आत्मघातकी स्फोट घडवण्याबाबत मुख्यमंत्र्यांना धमकी देण्यात आली आहे. धमकी आल्यानंतर पोलिस सतर्क झाली आहे. मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्यानंतर शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ सुरक्षा वाढवण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांची सूरक्षा आणखी कडक करण्यात आली असून घडामोडीवर गृहविभागही लक्ष ठेवून आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक महिन्यापूर्वी मंत्रालयात धमकीचे निनावी पत्रही आले होते. विशेष म्हणजे काॅल करुनही नक्षलवाद्याकडून धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. गडचिरोलीसारख्या आदीवासी भागात शिंदे पालकमंत्री होते, ते तेथे गावागावात जात होते. नक्षलवादी कारवाया करणाऱ्यांचे आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे त्यांना नक्षलवाद्यांकडून धमकी दिली जात आहे.