बीड :पोदारची ऑनलाईन शाळा सुरु!
बीड – दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशातील शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.जून महिन्यात शैक्षणिक वर्षास प्रारंभ होतो पण देशात,राज्यात सर्वत्रच कोरोनाबधीत रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे सध्यातरी कुठल्याच जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याचे चित्र दिसत नाही. येणाऱ्या वर्षात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे म्हणूनच बीड मधील नामांकित असलेल्या पोदार इंटरनॅशनल स्कूलने आज पासून ऑनलाईन शाळा सुरु केली आहे.
आज (दि.८) रोजी सकाळी पोदार स्कूल मध्ये काही पालक सदस्यांची आणि प्राचार्यांची (पी. टी. ए.) मिटिंग झाली. या मीटिंग दरम्यान सध्या सुरु असलेल्या परिस्थितीमध्ये प्रशासनाचे आदेश येई पर्यंत सध्यातरी ऑनलाईन स्कूल सुरु करत असल्याचे पोदार प्राचार्यांनी सांगितले आहे.पोदार स्कूल मधील शिकणाऱ्या मुलांना Zoom एप् द्वारे ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती हया मिटिंगमध्ये देण्यात आली.ऑनलाईन शिकवण्यात येत असलेल्या सर्व विषयांचा टाईमटेबल मुलांपर्यंत पोहचवला असल्याचे प्राचार्यानी स्पष्ट केले. स्कूल सुरू झाल्यास कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून मुलांच्या संरक्षणाबाबदही या मिटिंग मध्ये चर्चा झाली.पालकांनी स्वतः आणि मुलांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून कसे दूर ठेवायचे याचे मार्गदर्शन प्राचार्यांनी केले.उपस्थित पालकांनी आजच्या मीटिंगमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला असून सध्यपरिस्थिती मध्ये मुलांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान टाळण्याकरिता पोदार स्कूलच्या ऑनलाईन शिक्षण देण्याच्या निर्णयाचे स्वागत सर्व (पी.टी.ए.) पालक सदस्यांनी केले. सध्याच्या परिस्थितिमध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून बचाव करण्याकरिता आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता मुलांचे ऑनलाईन स्कूल सुरु ठेवणे हा एकमेव पर्याय दिसत असल्याचे पालकांनी म्हटले आहे आणि लवकरच स्कूल सुरु होईल अशी आशाही व्यक्त केली.