बीड

आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत बीडची नयन बारगजे चमकली

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

28 Sept :- जागतिक तायक्वांदो अंतर्गत नेपाळ तायक्वांदो महासंघ आयोजित जी -२ रॅंकींग ३ री माऊंट एव्हरेस्ट आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पोखरा येथे बीडच्या कु. नयन अविनाश बारगजे हिने कांस्यपदक पटकावले आहे. या स्पर्धेत भारतीय विशेषतः महाराष्ट्रातील खेळाडूंनी १ सुवर्णपदक, ४ रौप्यपदके व २ कांस्यपदके जिंकली आहेत.


पोखरा ( नेपाळ) येथे २१ ते २६ सप्टेंबर २०२२ दरम्यान जी -२ रॅंकींग ३ री माऊंट एव्हरेस्ट आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा २०२२ पार पडली.जागतिक तायक्वांदो चे अध्यक्ष चाॅय चॉंग ओन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत भारत, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, अमेरिका, स्पेन, तुर्कस्तान, केनिया, नेपाळ, मलेशिया, हॉंगकॉंग, भुतान , श्रीलंका, बांगलादेश , ब्रम्हदेश आदी देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. शिवम शेट्टी या महाराष्ट्राच्या खेळाडूने रोमहर्षक अंतिम सामन्यात पाकिस्तान च्या खेळाडूला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले.

गौरव भट, शिवानी भिल्लारे, शृतीका टकले व नॅन्सी यांनी ४ रौप्यपदकांवर नाव कोरले. बीडच्या कु.नयन अविनाश बारगजे हिने ४६ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. नम्रता तायडे हीने देखील वरिष्ठ गटात कांस्यपदक जिंकले. या सर्व खेळाडूंना शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे, लाला भिल्लारे , प्रविण सोंनकुल, डॉ. अविनाश बारगजे व अमोल तोडणकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.


नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख मॅडम, अरविंद विद्यागर सर, विनायक गायकवाड , महाराष्ट्र संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे, प्रा. डॉ. राजेश क्षीरसागर, जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष नितीनचंद्र कोटेचा, दिनकर चौरे, राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक डॉ.अविनाश बारगजे, जया बारगजे, बन्शी राऊत, भरत पांचाळ, सुभाष पोठरे, डॉ विनोद पवार, सचिन जायभाये, डॉ शकील शेख, उज्वल गायकवाड, नवीद शेख, सचिन कातांगळे, अनिस शेख ,अमित मोरे, प्रसाद साहू सर, नितीन आंधळे, बालाजी कराड , कृष्णा उगलमुगले व आदित्य भंडारे यांनी या खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.