बाळासाहेबांची सावली म्हणून ओळख असणारे चंपासिंह थापाही शिंदे गटात
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
26 Sept :- शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वात विश्वासू आणि 1970 पासूनत्यांच्यासोबतचे वैयक्तिक सहकारी म्हणून मातोश्रीवर राहणारे चंपा सिंह थापा यांनी मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. राजकीय मुद्द्यापेक्षाही ही घडामोड भावनिक मानली जात आहे. 2012 पासून त्यांच्या निधनानंतर मातोश्रीपासून दूर गेले होते त्यानंतर ते आज ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.
चंपासिंह थापा यांची बाळासाहेबांची सावली अशी ओळख आहे. बऱ्याच वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंचे चंपासिंग हे सहायक होते. नेपाळहून 50 वर्षांपूर्वी चंपासिंह थापा मुंबईत आले होते. त्यावेळी के. टी. थापा हे नाव महाराष्ट्राच्या कबड्डी क्षेत्रात नावाजलेले होते. ते मुंबईचे नगरसेवक झाले. त्यानंतर मोतोश्रीवर के. टी. थापा यांच्यासोबत चंपासिंह थापा आले. तेव्हापासून चंपासिंह थापा, बाळासाहेब ठाकरे हे समीकरण बनले.
बाळासाहेब ठाकरेंच्या औषधांपासून भोजनापर्यंत सर्व जबाबदारी चंपासिंह थापा यांनी अत्यंत चोखपणे सांभाळली होती. खास करून मीना ठाकरे यांच्या निधनानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या भावनिक क्षणात चंपासिंह थापा सोबत होते. त्यांची मोठी भूमिका राहीली होती.
बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेतही चंपासिंह थापा उपस्थित असायचे. तेथे त्यांना टाॅवेल ते पाणी देण्यापासून सर्व कामे थापा करीत होते. जानेवारीमध्येच चंपासिंह थापा यांनी आपण मातोश्रीचेच सेवक आहोत असे सांगितले होते. परंतु त्यांनीच आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. थापा जरी शिंदे गटात गेले तरी राजकीय दृष्ट्या ही गोष्ट फारशी महत्वाची नाही परंतु, बाळासाहेबांचे भावनिक आधार शिंदे गटात गेले, याला भावनिक किनार असल्याचे सांगितले जात आहे.
बाळासाहेबांचे विचार शिंदे घेऊन चालले आहेत म्हणून मी ईकडे आलो अन्यथा मी आलोही नसतो. मी माझ्या मनाने आलो असे सांगत उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या प्रश्नावर थापा फारसे बोलले नाहीत, पण माझी आणि उद्धव ठाकरेंची भेट मधल्या काळात झाल्या असून बंगल्यावरही जाऊन आलो होते. बाळासाहेबांची सावली होतो आहे आणि नेहमीच राहील.