महाराष्ट्र

पवारांची फडणवीसांना कोपरखळी! मी पुण्याचा पालकमंत्री होतो तर नाकीनऊ यायचे…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Sept :- महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व्हायला महिनाभरापेक्षा जास्त काळ गेला, त्यानंतरही पालकमंत्र्यांची घोषणा झाली नव्हती, त्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं, यानंतर काल शनिवारी राज्याच्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली, यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री करण्यात आलं. फडणवीसांना 6 जिल्ह्यांचं पालकमंत्री केल्यानंतर अजित पवार यांनी निशाणा साधला.

‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांची जबाबदारी आहे, मी पुण्याचा पालकमंत्री होतो तर नाकीनऊ यायचे, त्यांना ते कसं पेलवणार हे माहिती नाही, पण शुभेच्छा आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या कोपरखळीला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

‘येत्या काळात त्यांचं राज्य आलं आणि त्यांनाही 2-4 जिल्हे ठेवायचे असले तर ते कसे मॅनेज करायचे, याचा गुरूमंत्र मी त्यांनाही देईन. माझ्याकडे हे जिल्हे नियोजन मंत्री म्हणून हे जिल्हे माझ्याकडे आले आहेत. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे, त्यामुळे 6 जिल्ह्यांचं काय घेऊन बसला आहात?’, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. फडणवीस यांच्यापाठोपाठ गिरीश महाजन यांना धुळे,लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.