शिंदे सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर; अतुल सावे बीडचे पालकमंत्री
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
24 Sept :- नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्याची जबाबदारी ही शिंदेंचे निकटवर्तीय असलेले शंभुराज देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे. मंत्रिमडळातील काही सदस्याकडे 3 तर काही जणांकडे एक किंवा दोन जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – जळगाव, बुलढाणा
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे- सांगली,
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत-परभणी,
उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड,
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर