महाराष्ट्र

शिंदे गटाला जोरदार धक्का! शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Sept :- मुंबईतल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या घेण्यासाठी उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. त्यामुळे शिंदे गटाला जोरदार धक्का बसला. मेळाव्यासाठी शिवसेनेकडून कायदा व्यवस्थेची हमी घेण्यात आली. सोबतच यावेळी कोर्टाने महापालिकेलाही फटकारले.

ठाकरे गटाला हायकोर्टाने मेळावा घेण्याबाबत हिरवा कंदील मिळाल्यानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार अशी चर्चा असतानाच शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले की, या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार नाही. परवानगीला आमचा विरोध नव्हता. आम्हाला परवानगी मिळावी हाच आमचा हेतू होता. न्यायालयाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे.

शिंदे गटाचे सदा सरवणकर यांच्या याचिकेवर कोर्टाचे निकाल वाचन झाले. शिवसेना कुणाची हे अद्याप ठरलेले नाही. अद्याप निकाल आलेला नाही. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका हायकोर्टाने आज फेटाळून लावली. तिन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून आज मुंबई उच्च न्यायालयात प्रदीर्घ चर्चा झाली.

शिवसेनेकडून अ‌ॅड. चिनाॅय, शिंदे गटाकडून जनक द्वारकादास यांनी बाजू मांडली. महापालिकेतर्फेही अ‌ॅड. मिलिंद साठे यांनी बाजू कोर्टात आज मांडली​​​​. तिन्ही गटाचा युक्तिवाद आता संपला असून शिंदे गटाला हायकोर्टाने धक्का देत त्यांची अंतरिम याचिका फेटाळली आहे.