सिनेमा,मनोरंजन

तनुश्री दत्ताचा गौप्यस्फोट! म्हणाली, मला मारण्याचा प्रयत्न झाला…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Sept :- अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2020 मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केले. त्यानंतर ती खूपच चर्चेत आली होती. तनुश्रीला काही जणांनी पाठींबा दिला तर काहींनी तिने नाना पाटेकर यांच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचं सांगितलं. तनुश्रीकडून प्रेरणा घेऊन त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी पुढे येत त्यांचाही अनुभव सांगितलं. त्यावरून ट्विटरवर MeToo मोहीम सुरू झाली.

बराच काळ चर्चेत असलेल्या या मोहिमेची सुरुवात भारतात तनुश्रीच्या आरोपांनी झाली. आता तनुश्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, कनेक्ट एफएम कॅनडाला मुलाखत देताना तनुश्रीने सांगितले की, तिच्या पाण्यात काहीतरी मिसळून सुद्धा तिला मारण्याचा प्रयत्न झाला आहे.

पुढे तनुश्री दत्ताने सांगितले की, ती उज्जैनमध्ये असताना तिच्या कारचे अनेक वेळा नुकसान झाले. यासोबतच तिचा या काळात भीषण कार अपघात झाला. ज्यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तनुश्री अनेक महिने अंथरुणावर पडून होती. तनुश्रीला या अपघाता सावरण्यासाठी बराच वेळ लागला. तनुश्रीने तिच्या मुलाखतीदरम्यान तनुश्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली, ‘माझ्या हत्येचा कट रचला जात आहे, माझ्या पाण्यातही विष मिसळले जात असल्याचे मला समजले आहे. यासाठी माझ्या घरी प्लॅनिंग अंतर्गत एक मेड पाठवण्यात आली होती. त्यानंतर मी बराच काळ आजारी पडले. तेव्हा माझ्या पाण्यात विष मिसळले जात असल्याची खात्री पटली.’

तनुश्रीने सांगितले की, जेव्हा मी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे वाईट परिणाम झाले. तसेच मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. ती म्हणाली की, ‘बॉलीवूड माफिया आणि आपल्या देशातील जुने आरोपी नेते अशा कारवाया चालवतात आणि लोकांना त्रास दिला जातो.’ तसेच ती म्हणाली की, ‘या सगळ्यामागे ते लोक आहेत ज्यांना मी MeToo मोहिमेअंतर्गत उघड केले होते.’

2 वर्षांपूर्वी तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. यानंतर ती बराच काळ वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र, प्रकरण वाढल्यानंतर पोलिसांनीही हस्तक्षेप करत प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाली. त्यानंतरही हा वाद बराच काळ चर्चेत होता. तनुश्रीवरून सुरू झालेल्या या वादाने मोठ्या सामाजिक मोहिमेचे रूप धारण केले होते. यावेळी तनुश्रीसोबत अनेक महिलांनी त्यांचे अनुभव शेअर केले होते.