महाराष्ट्र

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार! सध्या बाप पळवणारी टोळी महाराष्ट्रभर फिरतेय- ठाकरे

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Sept :- दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच शिवतीर्थावरच घेणार असून मुले पळवणारी टोळी ऐकली, पण सध्या बाप पळवणारी टोळी महाराष्ट्रभर फिरत आहे. ज्यांना सत्तेचे दूध पाजले, मानमरातब दिला. आता त्यांनी तोंडाची गटारे उघडली आहेत असा घणाघात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचा गोरेगावच्या नेस्को मैदानावर पहिलाच जाहीर मेळावा आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी गटाप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला ठाकरे संबोधन करीत आहेत.

ठाकरे म्हणाले, व्यासपीठावर मी एक रिकामी खुर्ची पाहिली. संजय राऊत यांची आहे, मी आत्ताच खूलासा करतो. संजय राऊत हे मोडेन पण वाकणार नाही, या निश्चयाने लढत आहेत. लढाईत ते सोबत आहेत. सर्वात आघाडीवर ते आहेत. व्यासपीठावर आल्यानंतर वडील जागेवर आहेत का नाही हे मी पाहिले.