महाराष्ट्र

पवारांचे राज्य सरकारला आव्हान; पत्राचाळ प्रकरणी चौकशीला सामोरे जायला तयार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Sept :- पत्राचाळप्रकरणी आपण चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, असे शरद पवारांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले. भाजप नेते अतुल भातखळककरांनी काल पत्राचाळप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठका घेतले म्हणत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. या आरोपाला शरद पवारांनी आज मुंबईतील वाय.बी. चव्हाण येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.

पवारांनी पत्राचाळ प्रकरणी भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, बैठकीच्या इतिवृत्तात सगळं काही स्पष्ट आहे. चौकशी करायची असेल तर लवकर करा आरोप खोटे ठरले तर काय करणार हे सरकारने स्पष्ट करावे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, राज्यात गुंतवणुकीच्या मुद्द्यावर राजकीय भूमिका नको, मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्याचा विचार करावा. राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर सकारात्मक राहावे.

दसरा मेळाव्यावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना पवार म्हणाले की, दसरा मेळाव्याबाबत वाद वाढू न देण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री शिंदेंची आहे. उद्धव ठाकरे यांच्या मागणीनंतर विलंब करणे हे योग्य नाही.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आजपासून तीन दिवस बारामतीच्या दौऱ्यावर आहे. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि अन्य नेते याआधीही बारामतीत आले होते. सीतारमण यांच्या दौऱ्याचे सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले. देशातले चित्र भाजपला अनुकूल ठेवायचे नाही. देशातली स्थिती बघूनच भाजपकडून तयारी सुरू असल्याचे पवार म्हणाले.

राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेसाठी शुभेच्छा असून, देशात विरोधकांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावे. विरोधकांची एकजूट यशस्वी झाली तर देशासाठी चांगले होईल, असे म्हणत पवारांनी विरोधकांना मोदींविरोधात एकत्र येण्याचे सांगितले आहे.

शरद पवारांनी मध्यस्थी केली नसती तर महाराष्ट्रात एकही प्रकल्प झाला नसता. त्यांनी गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी बैठक घेतली यात काही नवल नाही. मात्र या प्रक्रियेत पवारांचा काहीही संबध नाही. चौकशी करा पण पराचा कावळा करू नका. हा सगळा डाव असून, शरद पवारांना बदनाम करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून बदनाम करण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आरोपाचे खंडन करताना आव्हाड म्हणाले की, शरद पवारांनी 14 ऑगस्ट 2006 मध्ये मिटींग घेतली होती. देशामधील हाउसिंगबाबतचे सर्व जण या मिटींगला उपस्थित होते. हा प्रकल्प 1988 चा असून तेव्हापासून पत्राचाळीचे टेंडर दारोदारी भटकत राहीले. शरद पवारांना बैठका काही नव्या नाहीत. जेव्हापासून ते राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी 10-20 हजार बैठका घेतल्या असतील. अनेक प्रकल्पांत त्यांनी मध्यस्थी करून बैठका घेतल्या. सगळे अडकलेले प्रकल्प, कोकण रेल्वेला दिशा देण्याचे काम शरद पवारांनी दिले.

शरद पवारांनी मध्यस्थी केली नसती तर महाराष्ट्रात एकही प्रकल्प झाला नसता. त्यांनी गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी बैठक घेतली यात काही नवल नाही. मात्र या प्रक्रियेत पवारांचा काहीही संबध नाही. चौकशी करा पण पराचा कावळा करू नका, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

नुकतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने 277 जागांवर यश मिळवले असून भाजप आणि शिंदे गटाला 210 ग्रामपंचायतीत यश मिळाले, एकंदरीतच महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळाले. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.