महाराष्ट्र

​​​​​नायक चित्रपटात अनिल कपूर नसते तर कोश्यारी असते; राज्यपालांची फडणवीसांकडून स्तुती!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Sept :- अनिल कपूरच्या नायक चित्रपटात अनिल कपूर नसते, तर भगतसिंह कोश्यारी यांना घेता आले असते, अशी व्यक्तिरेखा आपल्या राज्यपालांची आहे. त्यांच्या मनात स्वार्थ नाही. ते जे करतात ते देशासाठी करतात. राज्यपालांनी 3 वर्षांत 1 हजार 77 कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यांनी तीन वर्षांत 48 विद्यापीठाच्या काॅन्व्हेकेशनला त्यांनी उपस्थिती लावली, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांची स्तुती केली. ‘भगतसिंह कोश्यारी अ सोल डेडिकेशन टू नेशन’ या राज्यपाल कोश्यारी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले, देशभक्तीसाठी सारे जीवन राज्यपाल कोश्यारींनी वेचत आहेत. प्रत्येक जबाबदारी मेहनत आणि सचोटीने निभवण्याचे काम ते करीत आहेत. पक्षाचे अध्यक्ष, विरोधी नेता, मुख्यमंत्री, खासदार, संघाचे प्रचारक असो की, राज्यपालाच्या रूपात त्यांनी आपले काम दर्जेदारपणे निभावले.

फडणवीस म्हणाले, विधानसभा, विधान परिषदेतसह भगतसिंग कोश्यारी लोकसभेतही राहीले. राज्यसभेतही असावे. त्यांची व्यक्तिरेखा अशीच आहे की, ते जिथेही जातात तिथे लोकांना वाटते की, ते खूप वर्षांपासून आहेत. राज्यपाल कोश्यारी राज्यात तीन वर्षांपासून आले आहेत. त्यात दोन वर्षे कोविडचेच होते. बाहेर निघू नका अशा सूचना असल्या तरीही राज्यपाल ऐकणार कुठे त्यांनी तीन वर्षात 1 हजार 77 कार्यक्रमाला हजेरी लावले. जिथे सरकारचे मंत्री आणि मुख्यमंत्री कुठेच जात नव्हते, तेव्हा राज्यपाल महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यात जात होते.

फडणवीस म्हणाले, राजभवनालाही पहाटे चार वाजताच उठणारे राज्यपाल पहिल्यांदाच मिळाले असेल. सर्व वेळ ते सर्वांना व्यस्त ठेवतात. राज्यपालांचे रेकार्ड म्हणजे तीन वर्षांत 48 विद्यापीठाचे काॅन्व्हेकेशनला त्यांनी उपस्थिती लावली आहे हे विशेष. राज्यपालांची कार्यपद्धती खूप मोठी गोष्ट आहे, राज्यपालांनी राजभवनाला लोकभवनात रूपांतरीत केले. कोणतीही व्यक्ती राजभवनात येऊ शकते हे त्यांच्यामुळेच शक्य झाले. राज्यपालांच्या स्वभावाचे गुण पुस्तकात आले आहेत.

फडणवीस म्हणाले, लोकसभा आणि राज्यसभेद्वारे त्यांनी विविधांगी विषय त्यांनी हाताळले. वन रॅंक वन पेन्शन ही देशातील सैनिकांची मोठी मागणी होती. ती जबाबदारी भगतसिंह कोश्यारींनी स्वीकारली. त्यानंतर केंद्राला अहवाल सादर केला. त्यानंतर ती योजना सैनिकांसाठी लागू झाली. मोदींऐवढेच भगतसिंह कोश्यारी यांनाच या योजनेचे श्रेय जाते.