महाराष्ट्र

रश्मी ठाकरेंबद्दल अनावधानाने बोलून गेलो, ते शब्द मागे घेतो- रामदास कदम

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Sept :- मी आंदोलनाला घाबरत नाही. मला सगळा महाराष्ट्र ओळखतो. मी जो बोललो त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. जे वास्तव आहे ते मी बोलतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी त्यांच्याविरोधात राज्यभरात होत असलेल्या आंदोलनावर दिली. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यांनी शिवसेना प्रमुखांची भूमिका घ्यावी, या अर्थाने माझे बोलणे होते, असे ते म्हणाले. मी रश्मी ठाकरे यांच्याबाबत बोलायला नको होतं. रश्मी ठाकरे यांच्याविषयी जे बोललो ते शब्द मागे घेतो, पण दिलगिरी व्यक्त करणार नाही, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

माझे तोंड बंद केले. बाळासाहेब गेल्यानंतर माझी भाषण कमी केली गेली. मीडियापासून मला बाजूला केले. माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न केला. आम्ही काय गुन्हा केला, आमचा दोष काय, असा सवाल रामदास कदम यांनी केली. तसेच माझ्या मुलावर अन्याय झाल्याने माझी खदखद आहे आणि ती कायम राहणार आहे, असेही ते म्हणाले. सुषमा अंधारे कोण आहेत, हे मला माहित नाही. मला मराठवाड्यात फिरू देणार नाही, या सुषमा अंधारे यांच्या अशा आव्हांनाना किंवा बोलण्याला मी भीक घालत नाही, असे रामदास कदम म्हणाले.

रामदास कदम यांनी दापोली येथील सभेत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना नेते संतप्त आहेत. मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, हे किती वेळा सांगाल? तुम्हाला शंका आहे का, अशा शब्दात रामदास कदम यांनी टीका केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या.

माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. मी शिवसेनेत असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, अशी टीका रामदास कदम यांनी केली होती.