महाराष्ट्र

भास्कर जाधवांचा मेंदू सडलेला, डोकं नासलेलं- कदम

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 Sept :- “भास्कर जाधव यांचा मेंदू सडलेलं असून, त्यांचे डोके नासलेलं आहे. त्या नासक्या डोक्यात नासकेच विचार येतात. त्यामुळे त्यांचे डोके डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. तसेच भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही”, अशी खरमरीत टीका शिंदे गटाचे आमदार तसेच मंत्री रामदास कदम यांनी केली शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यावर केली आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते.

रामदास कदम यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा, अशी खोचक टीकाही भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केली होती. त्यावर आता कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम म्हणाले की, “काही दिवसांत भास्कर जाधव लोकांना दगड मारेल, अशी त्यांची अवस्था झाली आहे. जो एक पक्षाचा नेता आहे तो स्टेजवर नाचतोय हे जनतेने पहिल्यांदा पाहिलेय. उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी भास्कर जाधव हे माझ्यावर टीका करतायेत. हे दाखवण्याचा बालिश प्रयत्न आहे, त्यांना कोणीही भीक घालणार नाही. राज्यातील जनता थू-थू करत त्यांच्यावर हसते. नाचक्या डोक्याच्या विचाराच्या माणसाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता नाही.”

पुढे भास्कर जाधववर टीका करताना कदम म्हणाले की, “कुत्ता भौंकता है, हाथी अपनी चाल चलता है, भोकणेवाला कुत्ता कभी काटता नही, म्हणून अशा भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही.”

रामदास कदम यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करा. मुंबईतल्या शौचालयात जेवढी घाण नाही तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर आली, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये रविवारी संध्याकाळी पार पडलेल्या मेळाव्यात शिंदे समर्थक आमदार रामदास कदम यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. त्याला आता शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. मात्र, यावेळी त्यांची जीभ घसरली.

भास्कर जाधव आणि त्यांच्या पत्नी माझ्या पाया पडले, असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दापोलीतील कार्यक्रमात केले होते. त्यावरून भास्कर जाधव यांनी रामदास कदमांची वैचारिक पातळी काढली. ते म्हणाले, “वडिलांचे निधन झाल्यानंतर रामदास कदम, सुनील तटकरे, अनंत गिते, हसन मुश्रीफ आले. समवयस्क मंडळी असलेल्या सर्वांच्या आम्ही सपत्नीक पाया पडलो. मात्र, रामदास कदम याचा अर्थ राजकारणाशी जोडत आहेत. रामदास कदमांना तातडीने वेड्याच्या रुग्णालयात दाखल केले पाहिजे.”​​​​​​

रामदास कदम तुमच्याकडे काही वैचारिक पातळी आहे की नाही. माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या लोकांना नमस्कार करणे हे आमचे संस्कार आहे. वडील वारल्यानंतर रामदास कदम आले होते, म्हणून मी त्यांना नमस्कार केला. मात्र, रामदास कदम हे त्याचा वेगळ्या अर्थाने राजकारणाशी जोडत आहेत. त्यांना तात्काळ वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायला पाहिजे, अशी खोचक टीका भास्कर जाधव यांनी केली.

जाधव म्हणाले की, रामदास कदम यांनी वापरलेली भाषा आतापर्यंत कोणीही वापरली नाही. आज हा विषय जसजसा महाराष्ट्रात जाईल, तसतशी महाराष्ट्रातील जनता आणि विशेष करून महिला वर्ग रामदास कदम यांची जोड्याने पूजा करतील. मुंबईमध्ये एक कोटी 30 लाख जनता राहते, त्यांच्याकरीता शौचालयाची व्यवस्था आहे, त्या सर्व शौचालयांची जेवढी घाण नाही तेवढी घाण काल रामदास कदमांच्या तोंडून बाहेर पडल्याचेही जाधव म्हणाले.